विनयभंग प्रकरणात 2 आरोपी निर्दोष

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याच्या आरोपातून दोन जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश (पोक्सो) तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी दिले. शेख दानीश शेख जावेद (वय 21) आणि समिना बेगम शेख जावेद (दोघेही रा. किराडपुरा) यांच्यावर अल्पवयीन मुलीचा पाठलाग, विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. खटल्यादरम्यान पीडिता आणि तिच्या आईने अभियोगपक्षाला सहकार्य केले नाही. उपलब्ध पुरावा संशयाच्या पलीकडे दोष सिद्ध करण्यास अपुरा ठरल्याचे न्यायालयाने नमूद केले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील डी. के. नागुला यांनी युक्तिवाद केला. आरोपींतर्फे अधिवक्ता पी.एस. उंटवाल यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व पुरावे विचारात घेऊन न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.